Ganeshotsav 2024 : नाशिकच्या रविवार कारंजा येथे साकारण्यात येणार नेपाळचे मुक्तीनाथ मंदिर
महेश महाले, नाशिक
अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण बाप्पाची आतुरतेनं वाट बघत आहेत.
गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मोठ्या मोठ्या गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. अनेक गणेश मंडळांनी वेगवेगळं आकर्षक देखावे उभारले आहेत, सुंदर सजावट केली आहे. प्रत्येकजण गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी जोमानं तयारीला लागले आहे.
विविध देखावे देखील साकारण्यात येत असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. नाशिकच्या रविवार कारंजा येथे नेपाळचे मुक्तीनाथ मंदिर साकारण्यात येत आहे. यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात येत आहे.
या मंदिराचा देखावा बनवण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून काम सुरू आहे. मुंबई येथील कलादिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर साकारण्यात येत असून नेपाळच्या धरतीवर हुबेहूब मुक्तीनाथ मंदिर हे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे.